
महापुराच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेच्या ताफ्यात आणखी दोन रबर बोटी
महापुराच्या पार्श्वभूमीवर शासन चिपळूणसाठी अधिक अलर्ट झाले आहे. नव्याने दोन रबर बोटी नगर परिषदेला दिल्या आहेत. या बोटींची सोमवारी गोवळकोट खाडीत चाचणी घेण्यात आली. तसेच लवकरच १०० नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी इच्छुकांंनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षीच्या २२ जुलैच्या महापुरात शहरातील बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांचा संसार वाहून गेला. या वेळी प्रशासनाची मिळालेली मदत पाहता त्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.
www.konkantoday.com