रत्नागिरीत उद्या ‘युवा संवाद, लंच विथ युथ’


तरुणांना शिक्षण तंत्रज्ञान व उद्योग समवेत सैन्यभरती बद्दल ‘युवा संवाद लंच विथ युथ’ कार्यक्रमाचे आयोजन उद्या (ता. 29) दुपारी 12.30 वाजता हॉटेल सन स्टार येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे नियोजन विधानपरिषद आमदार व भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व अंत्योदय प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.
तरुणांनी शिक्षण व तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून उद्योजक कसे बनावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या योजना, पात्रता व त्यांचा लाभ कसा घ्यावा याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या समवेतच सैन्यभरतीचे विविध प्रकार व त्यासाठी लागणारी पात्रता आणि सैन्यामधील थरारक अनुभव यांचे कथन एनएसजी कमांडो आदित्य टोकेकर करणार आहेत. या वेळी भाजप खासदार मनोज कोटक, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन व रत्नागिरी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजेश मयेकर उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button