
शिवभोजन थाळी उपक्रमाचा प्रारंभ
राज्य शासनाच्या शिवभोजन थाळी उपक्रमाचा प्रारंभ रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते काल जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन आहार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरीत जिल्हा रुग्णालय, एसटी बसस्थानकाजवळ हॉटेल मंगला आणि रेल्वे स्थानकावर नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
www.konkantoday.com