विदेशी नागरिकांनी केला मांडवी किनारा स्वच्छ

रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेले जर्मनीतील पर्यटक फेलीक्स वारगा आणि जेनी क्रीस्ट हे मांडवी किनार्‍यावर फिरण्यासाठी आले असता तेथे त्यांना कचर्‍याचे साम्राज्य दिसले. त्यांनी तातडीने हा पडलेला कचरा गोळा करण्यास सुरूवात केली. फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी हा कचरा गोळा करण्यास सुरूवात केल्याचे लक्षात आल्यावर शिवप्रतिष्ठानचे अभिजित गिरकर, सुशिल कदम, जयदीप साळवी, गणेश गायकवाड यांनी त्या ठिकाणी धाव घेवून त्यांना मदत करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी हॉटेल सीफॅनचे मॅनेजर पंचन आठल्ये यांनी आपल्या स्टाफसह तेथे उपस्थित झाले व त्यांनीही किनारा स्वच्छ करण्यास मदत केली. बघता बघता किनार्‍यावर पसरलेली अस्वच्छता दूर झाली आणि या पर्यटकांच्या चेहर्‍यावर समाधान पसरले.
पर्यटनासाठी आलेले हे जर्मनीचे पर्यटकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले आमच्या देशातही समुद्र किनारा आहे. न जाणो तिकडचा कचरा इकडे आला असेल. तर इकडचा किनारा खराब झाला असेल. म्हणून आपण ही स्वच्छता करण्यास सुरूवात केली. एरव्ही वेगवेगळ्या मोहिमेंतर्गत स्वच्छता मोहिमा आखून फोटो प्रदर्शित करणार्‍यांना एकप्रकारे चांगलीच शिकवण या विदेशी नागरिकांनी घालून दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button