
रत्नागिरी जिल्हा रग्बी संघाची विजयी सलामी
परभणी येथे चालू असलेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर रग्बी स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा रग्बी संघ चौदा वर्षांखालील मुले यांनी विजयी सलामी दिली आहे.पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये रत्नागिरी संघाने उस्मानाबाद संघावर एक शून्य असा विजय मिळवला.रत्नागिरीच्या संघांमध्ये समर्थ भोसले- कर्णधार -चिपळूण,शर्व थरवल -उपकर्णधार- गुहागर,शुभम कदम, पार्थ कानेहेरे, निहार जाधव, सोहम कदम, सिद्देश ठाकरे ,अथर्व पवार ,सोहम हेगिष्टे, पारस घाणेकर, यश निमुणकर,वेद शिर्के हे सहभागी झाले आहेत.रत्नागिरी रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश माटे , सेक्रेटरी योगिता खाडे,तसेच प्रशिक्षक विनोद राऊत व हुजैफा ठाकूर यांचे मार्गदर्शन संघाला लाभले.
www.konkantoday.com