रत्नागिरीच्या दोन कन्यांची खो-खोमध्ये सुवर्ण कामगिरी
खेलो इंडिया राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा महोत्सवात महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली आहे. त्यात महाराष्ट्र खो-खो संघाचे नेतृत्व करणार्या रत्नागिरीच्या कन्या अपेक्षा सुतार व श्रद्धा लाड यांनी उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक पटकावले आहे.
आसाम गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो २१ वर्षावरील संघामध्ये रत्नागिरीच्या राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा आणि श्रद्धा यांची निवड झाली होती. या स्पर्धेत दोघीनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या दोन्ही खेळाडूंना रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
www.konkantoday.com