
आशा-गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे संप तूर्तास स्थगित केला
विविध मागण्यांबाबत अनेक दिवसांपासून संपावर असलेल्या आशा-गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे संप तूर्तास स्थगित केला आहे.त्यामुळे रविवारी (दि. ३) राज्यात होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व आशा सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिली.www.konkantoday.com