भाजपची जिल्हाध्यक्ष निवड बुधवारी,2 जिल्हाध्यक्ष होणार
भाजपा जिल्हाध्यक्ष निवड येत्या बुधवारी (ता. 29) होणार आहे. खासदार मनोज कोटक यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ते उपस्थित राहणार आहेत. आमदार प्रसाद लाड, संघटनमंत्री सतीश धोंड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने हेही खासदार कोटक यांच्यासह उपस्थित राहणार आहेत.29 जानेवारीला 11 वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष निवड होईल. मंडल अध्यक्ष व प्रत्येक ऋमंडळ समितीने प्राधिकृत केलेला सदस्य जिल्हाध्यक्ष निवड करतील. यापूर्वी विविध मडलांच्या अध्यक्षांची निवड झाली असून आता जिल्हाध्यक्ष निवड होईल. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. या निवडणुकीसाठी खासदार प्रमोद कोटक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीचा हा कार्यक्रम रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सभागृहात होणार आहे. या वेळी भाजपचे सर्व कार्यकर्ते, नेते यांना नवनिर्वाचित होणार्या अध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
संघटनात्मक नियुक्यांची पूर्तता झाल्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे दोन जिल्ह्यात विभाजन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपला जिल्ह्यात बळ मिळण्यासाठी व प्रशासकीय कामकाज व पक्षीय वाढीसाठी हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार पाहता शिवसेनेचेही दोन जिल्हाप्रमुख आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्वांत मोठ्या संघाचेही दोन जिल्हाप्रमुख आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 9 तालुके असून एक टोक मंडणगड व दुसरे राजापूर. या भागात सहज पोहोचणे, कार्यकर्ता संपर्क, निवडणुकीवेळी सभा घेणे आदीसाठी दोन जिल्हाध्यक्ष ही काळाची गरज असल्याने कार्यकर्त्यांची मागणी होती. याबाबींचा विचार करून भाजपने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
www.konkantoday.com