जिल्ह्यात पुन्हा मनिऑर्डर संस्कृती सुरू करण्याचा घाट-आमदार नीतेश राणे
जिल्हा नियोजनच्या ११८ कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देऊन महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्गची थट्टा केली आहे. एवढ्या निधीमधून विकासकामे होणार तरी कशी? असा प्रश्न आमदार नीतेश राणे यांनी आज उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती रोखून या जिल्ह्यात पुन्हा मनिऑर्डर संस्कृती सुरू करण्याचा घाट राज्य सरकार घालतंय, असेही ते म्हणाले.
. ते म्हणाले, ”जिल्हा नियोजनच्या सभेत सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या २४० कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती; मात्र गतवर्षीचा ४० टक्के निधी अखर्चित राहिला.
www.konkantoday
com