
मिशन बंधारे अभियानातून ३६० बंधारे उभारले
राजापूर तालुक्यातील पंचायत समितीने लोकसहभागातून मिशन बंधारे हे अभियान राबविले. राजापूर तालुक्यात उन्हाळ्यामध्ये भासणार्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले. या बंधार्याच्या बांधकामासाठी श्रमदान करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विविध प्रकारचे ३६० बंधारे उभारले गेले असून त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासेल असा अंदाज आहे.
www.konkantoday.com