
आश्वासने शहर विकासाची मात्र विकास होतोय बेकायदेशीर टपर्यांचा
रत्नागिरी शहरात नगराध्यक्ष निवडणुकीत नागरिकांना विकास कामाची मोठी आश्वासने सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आली होती. त्यामुळे आता शहराचा मोठा विकास होणार अशा अपेक्षेत असलेल्या रत्नागिरीकरांना मात्र वेगळेच चित्र पहावयाला मिळत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासह अरूंद रस्त्यावर रातोरात अनेक टपर्या उदयास येत आहेत. त्यामुळे संध्याकाळी त्या रस्त्यावरून गेलेल्या नागरिकांना नवीनच टपरी उदयाला आलेली दिसत आहे. काही टपर्या मटक्याच्या तर काही टपर्या पान तंबाखूच्या, त्याला जोड वडापाव आणि चायनीजच्या टपर्या निघाल्या असून काही टपर्या बचतगटाच्या नावानेही निघाल्या आहेत. या टपर्यांना आता नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली जागा ही रूंदीकरणासाठी देण्यात आलेली असून नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी, पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने नगरपरिषदेने ताब्यात घेतल आहे. मात्र सध्या तरी अशा मोकळ्या दिसेल त्या जागेवर टपर्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष घालावे अशी सामान्य जनतेची मागणी आहे.
www.konkantoday.com