
पावसात विहीर ढासळल्याने ऐन पावसाळयातच बाणकोटमधील या तिन्ही वाडयांना पाणीटंचाई
बाणकोट किल्लावाडी मोहल्ल्यासह किल्लावाडी तसेच बौध्दवाडीची वर्षोनुवर्ष तहान भागवणारी पिण्याच्या पाण्याची विहीर पुर्णपणे ढासळल्याने ऐन पावसाळयातच बाणकोटमधील या तिन्ही वाडयांना पाणी -पाणी करण्याची वेळ येणार आहे.
मंडणगडमध्ये रविवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेले पाच दिवस कोसळत असलेल्या पावसाच्या मुसळधारेने मंडणगडातील जनजिवन पार विस्कळीत करून टाकले आहे.
www.konkantoday.com