आंब्याची निर्यात वाढवण्यासाठी नवे निर्यातदार शेतकरी तयार करा -जि.प. अध्यक्ष रोहन बने
आंब्याची निर्यात वाढण्यासाठी नवे निर्यातदार निर्माण झाले पाहिजेत. आंबा निर्यातीसाठी व्यवस्थापनाने शेतकर्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. निर्यातीतून मिळणार्या फायद्याची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. बाजार समितीच्या लिलावगृहाचा शेतकर्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. आज आफ्रिकेतून आंबा आपल्या कोकणात येतो. त्यामुळे शेतकर्यांनी जागरूक राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष श्री. रोहन बने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, अपेडा नवी दिल्ली, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम आंबा उत्पादन व निर्यात यावर आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते
www.konkantoday.com