
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देऊन त्यांना जीवदान देणारास्टेमी’ प्रकल्प लवकर रत्नागिरीसह १० जिल्ह्यांमध्ये
हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या आजाराने मृत्युचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेऊन ‘स्टेमी’ प्रकल्प लवकर सुरू करण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देऊन त्यांना जीवदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात औषधोपचार करुन मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ‘स्टेमी’ प्रकल्पातून केले जाणार आहे.
‘स्टेमी’ प्रकल्प पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या १० जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
www.konkantoday.com