कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्ते धडकले प्रदेश अध्यक्षांपर्यंत
रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले हे मनमानी कारभार करीत असून कार्यकारिणी निवडताना कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांवर जाणुनबुजून अन्याय केला जात आहे. यामुळे जिल्हाध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी रत्नागिरीतील राकेश चव्हाण व अन्य कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये परत एकदा वादाला तोंड फुटले आहे.
www.konkantoday.com