
भाजपच्या नेमणुका जाहीर, रत्नागिरी शहर ची जबाबदारी राजन फाळके यांच्यावर, रत्नागिरी दक्षिण ची जबाबदारी संयोग उर्फ दादा दळी आणि रत्नागिरी उत्तर साठी विवेक सुर्वे यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरीच्या मंडळ अध्यक्षांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी घोषित केली आहे.
त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यासाठी रत्नागिरी शहर, रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तर अशा तीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेतरत्नागिरी शहर ची जबाबदारी राजन फाळके यांच्यावर, रत्नागिरी दक्षिण ची जबाबदारी संयोग उर्फ दादा दळी आणि रत्नागिरी उत्तर साठी विवेक सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याशिवाय संगमेश्वर दक्षिण मंडळ अध्यक्ष म्हणून रुपेश कदम, लांजा मंडळ अध्यक्षपदी चंद्रकांत मांडवकर, तर राजापूर पूर्व मंडळ अध्यक्षपदी भास्कर सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे
www.konkantoday.com