
कुंभार्ली घाटात रिक्षा-एसटी अपघातात महिला जखमी
चिपळूण रिक्षाची एसटीला धडक बसून अपघात झाल्याची घटना शनिवारी कुंभार्ली घाटात घडली. या अपघातात महिला जखमी झाली आहे.
अपघातानंतर रिक्षातील संतप्त तरुणाने बसची पुढील काच फोडली. याप्रकरणी त्या तरुणासह, अन्य एकावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश चंद्रकांत शिंदे (४९), पार्थ राकेश शिंदे (२०, दोघे-कोळकेवाडी पायरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अरुण बापू माळवदे (३६, चिपळूण आगार) यांनी दिली आहे. पोलिसांनी माहितीनुसार अरुण माळवदे हे चिपळूणहून पिंपरी-चिंचवडकडे एसटी घेऊन येत होते. दिलेल्या यावेळी कुंभार्ली घाट चढतेवेळी सोनपात्राच्या पुढील बाजूस असलेल्या एका वळणावर आले असता कराड बाजूकडून चिपळूण बाजूकडे घाट उतरत असताना रिक्षावरील चालकाने एस.टी. बसच्या चालक बाजूकडील चाकावर धडक दिली.
या अपघातात रिक्षामधील महिला प्रवासी चंद्रकांत शिंदे या जखमी झाल्या आहेत. हा अपघात घडल्याच्या रागातून पार्थ शिंदे याने एसटी बसची पुढील काच फोडली. यात एसटीचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसानी दिली.www.konkantoday.com




