महावितरणचे वीज बिलापोटी चिपळूण व गुहागरमधून आतापर्यंत सुमारे २९ कोटी रुपये थकीत

महावितरणचे वीज बिलापोटी चिपळूण व गुहागरमधून आतापर्यंत सुमारे २९ कोटी रुपये थकीत असल्याने हा विभाग काहीसा अडचणीत आला आहे.दरवर्षी महावितरणचे चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यात सरासरी ४ कोटी रुपये थकीत असतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमुळे वीज बिल वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने आणखीनच फटका बसला आहे. या दोन तालुक्यातील एकूण ग्राहकांपैकी ५३,६१८ ग्राहक थकबाकीदार आहेत. अशी सुमारे १७ कोटी रुपयांची थकबाकी असून, मागील १२ कोटी रुपये थकबाकी आहे. असे एकूण २९ कोटी रुपये थकीत असून हे प्रमाण सरासरी थकबाकीच्या तीनपट आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button