गणपतीपुळ्यात २५ पासून माघी गणेशोत्सव
श्री देव संस्थान गणपतीपुळे येेेथे दरवर्षीप्रमाणे २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
२५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता श्रींची महापूजा, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता गणेशयाग देवता स्थापन होणार आहे. २५ ते ३० जानेवारीला दररोज सायंकाळी सात वाजता सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, २६ रोजी सकाळी ७ वाजता कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहुती, २७ ला सकाळी ११ वाजता सहस्त्र मोदक समर्पण, २८ रोजी श्रींची पालखी मिरवणूक (प्रदक्षिणा), सायंकाळी ४ वाजता निघेल. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ११.३० वाजता महाप्रसाद आहे. २५ ते ३० जानेवारीला दररोज सायंकाळी ७.३० वा. किर्तनकार मिलिंदबुवा बडवे (पुणे) यांचे कीर्तन आहे. खर्ड्याची लढाई, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संतोबा पवार, गोकर्ण महाबळेश्वर स्थापना, गणेश जन्म, संत कुर्मदास, लळित गणेश स्वयंवर विषयांवर किर्तन सादर करणार आहेत.
३१ ला रात्री १० वा. दहा बाय दहाची चौकट मोडणार हे विनोदी नाटक आहे. १ फेब्रुवारीला रात्री १० वा. श्री गणेश प्रासादिक नाट्यमंडळातर्फे गेला माधव कुणीकडे नाटक होईल.
www.konkantoday.com