उशिरा आलेल्या दहा ते बारा अधिकारी सभागृहाबाहेर उभे
पालकमंत्री अनिल परब यांनी शासनाच्या खातेप्रमुखांना जिल्हा नियोजनच्या पहिल्याच बैठकीत चांगलीच शिस्त लावली. मला कोण विचारणार, अशा आविर्भावात वावरणार्या दांडीबहाद्दर आणि लेटलतिफ अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला. उशिरा आलेल्या दहा ते बारा अधिकार्यांना अल्पबचत सभागृहाबाहेर उभे करून ठेवले होते. अधिकार्यांना विद्यार्थ्यांसारखी दिलेल्या वागणुकीची दिवसभर चर्चा रंगली. बैठकीला उशिरा येणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी दिला.
www.konkantoday.com