
गुहागर तालुक्यातील जोरदार पावसाने मोडकाघर-पालशेत रस्ता खचला
गुहागर तालुक्यात पडणार्या वार्यासह पावसामुळे काही ठिकाणी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मोडकाघर ते पालशेत या मार्गावर यावर्षी नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीजवळील रस्ता खचल्याने येथील वाहतूक धोकादायक ठरली आहे. तर तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात नळपाणी योजनेला पाणी नाही अशी अवस्था बनली आहे.www.konkantoday.com