
ग्रामसभेत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत
चिपळूण: ग्रामसभेत झालेल्या शाब्दीक बाचाबाचीचा राग मनात धरून एकास घरात घुसून मारहाण केल्याची घटना ६ रोजी स्वंयदेव-नांदिवसे येथे घडली. या प्रकरणी अलोरे–शिरगाव पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पक नरसिंग शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद सुशील यशवंत शिंदे यांनी दिली. पुष्पक शिंदे याचे वडील नरसिंग रघुनाथ शिंदे यांच्यासोबत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सुशील शिंदे या दोघांची शाब्दीक बाचाबाची झाली होती. याच रागातून पुष्पक शिंदे याने सुशील शिंदे यांच्या घरात घूसून त्यांना मारहाण शिवीगाळ तसेच ठार मारण्याची धमकी दिली
Www.konkantoday.com