बीएसएनएलच्या २३० कर्मचार्यांपैकी १६४ कर्मचार्यांचे निवृत्ती प्रस्ताव मंजूर, ३१ जानेवारीला होणार निवृत्त
केंद्र सरकारने भारत संचार निगम या उपक्रमांतील कर्मचार्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील २३० कर्मचार्यांपैकी तब्बल १६४ कर्मचार्यांचे निवृत्ती प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या सर्व कर्मचार्यांच्या कामाचा शेवटचा दिवस ३१ जानेवारी २०२० हा राहणार आहे. या नंतरची बहुतांश कामे कंत्राटी कर्मचार्यांकडे सोपवली जाणार आहेत. तूर्त महत्वाची कामे कोल्हापूरच्या कार्यालयाकडे आली आहेत.
www.konkantoday.com