फिट इंडिया सायकल रॅलीत सहभागी होण्याची युवकांना संधी
नेहरू युवा केंद्र संघटन नवीन दिल्ली, महाराष्ट्र, गोवा झोन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारीला पणजी येथे फिट इंडिया अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १०० युवकांना सायकल रॅलीत सहभागी होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. सहभागी होणार्या युवकांची निवास, भोजन, जाण्यायेण्याचा खर्च आयोजकांतर्फे दिला जाणार आहे. पाच किमी अंतराच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी युवकांकडे स्वतःची सायकल असणे आवश्यक आहे. रॅलीत सहभागी होणार्या युवकांना नेहरू युवा केंद्रामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com