
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ
पालकमंत्री ना. अनिल परब यांच्या हस्ते २६ जानेवारीला रत्नागिरीत शिवभोजन योजनेचा प्रारंभ होणार आहे. दि. २४ जानेवारीपासून ना. परब जिल्हा दौर्यावर येणार आहेत.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेने फक्त दहा रुपयात पोटभर जेवणाची शिवभोजन योजना जाहीर केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे शासन स्थापन होताच मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजनेचा शुभारंभ लवकरच करण्याचे संकेत दिले होते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय कार्यवाही शासनाने पूर्ण केली आहे.
www.konkantoday.com