नामदार उदयजी सामंत यांच्याकडून रत्नागिरीतील एसटी स्टँडची पाहणी ,एक महिन्यात कामाची प्रगती न दिसल्यास कारवाई ,संपूर्ण काम पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार
कोट्यवधी रुपये खर्च करून रत्नागिरीत व्यापारी संकुलासह उभारण्यात येणाऱया एसटी स्थानकाच्या इमारतीचे काम रेंगाळले आहे त्यामुळे नागरिकांच्यात नाराजी होती आज नामदार उदय सामंत यांनी सकाळी प्रत्यक्ष एसटी स्टॅण्डला भेट दिली व त्यांनी कामाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व एसटीचे वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते या बांधकामाचा ज्यापद्धतीने वेग धरला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही.कंत्राटदाराने तातडीने वेगाने कामाला सुरुवात करावी .एक महिनाच्या आत कामाची प्रगती दिसली पाहिजे जर तसे झाले नाही तर कारवाई करावी लागेल .
स्टेशनचे काम पूर्ण होण्यास अजूनही दीड वर्ष लागेल असे कंत्राटदाराने सांगितले यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिना कामाचा आढावा घेण्यात यावा असे सामंतांनी सांगितले एसटी स्टँडचे काम पूर्णत्वाकडे जाण्याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले सध्या एसटी स्टॉप मुख्य रस्त्यावर संघवी फर्निचर नजीक करण्यात आला आहे त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होऊन बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी विभागात आणखीन दोन ठिकाणी स्टॉप सुरू करणार आहे त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही सामंत यांनी दिले व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले . त्यामुळे एकाच ठिकाणी होणारी प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे.यामुळे आता तरी एसटी स्टॅण्डचे काम मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com