रत्नागिरीच्या नेहा नेनेला पॉवर लिफ्टींगमध्ये सुवर्णपदक
रत्नागिरीची सुकन्या नेहा राजेश नेने हिने पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. नेहा नेने हिने कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातर्फे स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत १५६ विद्यार्थी तर ५७ विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात एम.कॉमचे शिक्षण घेत असलेल्या नेहा हिला कळवा येथील ज्येष्ठ पॉवरलिफ्टर चाळके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
www.konkantoday.com