मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रेंगाळले
गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या जमिनी, बांधकामे, झाडे यांच्या संपादनाची रक्कम महामार्ग लवाद न्यायाधिकरणाने लाभार्थ्यांना देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील दहा गावातील प्रकल्पबाधित मालकांना राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ३ कोटी ८५ लाख ५२ हजार ७५६ रुयपे दोन वर्षापासून येणे आहे. त्यामुळे या मालकांच्या अखत्यारितील जमिनीत चौपदरीकरणाचे काम थांबले आहे.
www.konkantoday.com