मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचा प्रश्न मार्गी लागणार
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी शासनाकडून १९० कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली होती. त्यानंतर सध्या शासनाच्या स्थगितीत हे काम अडकले होते. याबाबत तातडीने लक्ष घालून येत्या काही दिवसात हे बंधार्याचे काम मार्गी लावण्यात येईल असे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. याबाबत या भागाला लवकरच सामंत हे भेट देणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com