मालगुंड येेथे ५४ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन
मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती विभाग व मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्यावतीने १८ ते २० जानेवारी या कालावधीत मालगुंड येथील केशवसुत स्मारक येथे ५४ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी दिली आहे. या अधिवेशनात उच्च शिक्षणातील संधी, आंबा काजूसारख्या पिकांची उपयोगीता, रत्नागिरीतील उद्योगधंदे व भविष्यातील संधी, महिलांसाठी घरगुती व्यवसाय आदी विषयांवर चर्चासत्रांसह कविता वाचन, विज्ञान एकांकीका आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com