बाळासाहेब माने यांचा वाढदिवस नर्सिंग कॉलेजमध्ये जल्लोषात साजरा

रत्नागिरी तालुक्याचे माजी आमदार तथा दि यश फौंडेशन्सचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त सुरेंद्रनाथ यशवंत तथा बाळासाहेब माने यांचा वाढदिवस नर्सिंग कॉलेज अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी पत्नी सौ. माधवीताई माने यांनी बाळासाहेबांचे औक्षण केले. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा झाला. याप्रसंगी सुरवातीला कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्पनेवर आधारित नृत्य कार्यक्रम सादर केला. तसेच पारंपरिक कोळी नृत्य, शास्त्रीय नृत्य, रॉक साँग आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वाहवा मिळवली. या वेळी तरुणाईने जल्लोष केला.
कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्रा. चेतन अंबुपे, प्रा. रमेश बंडगर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांनी बाळासाहेब माने यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी कॉलेजच्या स्थापनेपासून कार्यरत अमित विलणकर, गुरु शिवलकर, अमित विलणकर, विक्रम मयेकर यांनीही अभिष्टचिंतन केले.
वाढदिवसानंतर बाळ माने यांनी विद्यार्थ्यांनी या सुरेख कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच नर्सिंग कॉलेजच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. नर्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थिनी आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत याकरिता आपण सार्‍यांनी हे महाविद्यालय अधिक जोमाने चालवू, असे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button