पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोकणातील शिलेदार- बाळ माने

कोकणात दर्जेदार आरोग्य शिक्षण मिळावे, याकरिता माजी आमदार तथा दि यश फौंडेशन्सचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त सुरेंद्रनाथ यशवंत तथा बाळ माने यांनी 25 वर्षांपूर्वी दि यश फौंडेशन्सची स्थापना केली. 2006 पासून मिरजोळे विमानतळासमोर प्रशस्त जागेत नर्सिंग कॉलेज सुरू केले. या कॉलेजचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेनुसार मुलगी शिकली पाहिजे व दर्जेदार शिक्षणाने समृद्ध झाली पाहिजे या हेतूनेच नर्सिंग कॉलेज काम करत आहे. कोकणातील सुमारे एक हजार विद्यार्थिनी या कॉलेजमध्ये शिकून नोकरीला लागल्या. त्या सर्व आत्मनिर्भर झाल्या व त्यांचे कुटुंबही सक्षम झाले. आरोग्य व शिक्षणात कार्य करणारे बाळासाहेब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोकणातील खरे शिलेदार आहेत. बाळासाहेबांचा आज 55 वा वाढदिवस त्या निमित्ताने…..
– डॉ. मीनाक्षी देवांगमठ,
पीएचडी इन नर्सिंग
प्राचार्य, दि यश फौंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग.बाळासाहेब माने हे भारतीय जनता युवा मोर्चा या भाजपाप्रणित युवा संघटनेतून पुढे आलेले उमदे नेतृत्व. वडील यशवंतराव, माजी आमदार तात्यासाहेब नातू, शिवाजीराव गोताड, कुसुमताई अभ्यंकर यांचा राजकीय वारसा आणि डॉ. ज. शं. केळकर, डॉ. शांताराम केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर कै. प्रमोदजी महाजन व कै. गोपीनाथजी मुंडे हे बाळासाहेबांचे राजकीय गुरु. रा. स्व. संघाच्या तालमीत तयार झालेल्या बाळासाहेबांनी भाजपशी बांधिलकी, तत्त्वप्रणाली, पक्षनेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपचे कार्य बहुजन समाजापर्यंत पोहोचवले. समाजाशी असलेली विकासाची नाळ कधीच तोडली नाही. वडील स्व. यशवंतराव माने यांच्या स्मरणार्थ बाळासाहेबांनी दि यश फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आता या संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. स्व. यशवंतराव हे हाडाचे समाजसेवक व शिक्षणप्रेमी होते. जनसंघापासून भाजपापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील बहुजन समाजाला त्यांनी पक्ष विचारसरणीशी जोडले. कोकणातील अनेक सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व त्यांनी केले.
दि यश फाउंडेशन्समार्फत आरोग्य जनजागृती कार्यक्रम व ग्रामीण विकास कार्यक्रम संचलित केले जातात. शिक्षणसंस्था व पॅरामेडिकल शिक्षणामध्ये गुणात्मक वाढीसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. बाळासाहेबांनी यशवंत प्राथमिक विद्यालय (स्थापना 1996), कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय (1997) आणि दि यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना 2006 मध्ये केली. आरोग्य शिक्षणाला वाढते महत्त्व आणि देश विकासासाठी भविष्यात प्रशिक्षित परिचारिकांची समाजाला मोठ्या प्रमाणात असलेली गरज ओळखून बाळासाहेबांनी मातोश्री कै. शकुंतला माने यांच्या स्मरणार्थ या कॉलेजची स्थापना केली.
विमानतळासमोरील 10 एकरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र प्रशस्त इमारत उभी आहे. भविष्यात येथे क्रीडा संकुल व विद्यार्थिनी वसतीगृह नियोजित आहे. चार हजार पुस्तके, नर्सिंग जर्नल्ससह ग्रंथालय आहे. अद्ययावत प्रयोगशाळा, फंडामेंटल लॅब, न्यूट्रिशन लॅब, कम्युनिटी, अ‍ॅनॉटॉमी, मिडवायफरी लॅब, कॉम्प्युटर लॅब आहे. क्वालिफाईड अध्यापक व ऑफिस स्टाप, स्टाफरूम, कार्यालय, अध्यापक, डॉक्टर्स, लेक्चरर्स येथे येतात. महाविद्यालयाची बस सुविधा आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक शिक्षणाची सुविधा जिल्हा परिषद, जिल्हा शासकीय रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, पीएचसी सेंटर- कोतवडे, जाकादेवी, हातखंबा, पावस येथे उपलब्ध आहे.कॉलेजच्या स्थापनेपासून बेसिक बी. एस्सी नर्सिंग 4 वर्षे डिग्री अभ्यासक्रम(B. S. C.- Nursing) अभ्यासक्रम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ए. एन. एम. नर्सिंग (ANM), (2008, 2 वर्षे डिप्लोमा अभ्यासक्रम), जी. एन. एम. नर्सिंग(G.N.M.) (2011, 3 वर्षे डिप्लोमा अभ्यासक्रम), पोस्ट बेसिक बी. एस्सी. नर्सिंग (P. B. Sc) (2012, 2 वर्षे डिग्री अभ्यासक्रम), एम. एस्सी. नर्सिंग(Post Graduate), (2019, 2 वर्षे अभ्यासक्रम अभ्यासक्रम) सुरू झाले. येथून बेसिक बीएस्सी, एएनएम, जीएनएम नर्सिंग या अभ्यासक्रमातून आतापर्यंत एक हजारांहून अधिक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. या सर्व विद्यार्थिनी शासकीय, खासगी सेवेत, शिक्षक, परिचारिका, प्राचार्य, लेक्चरर्स, ट्यूटर आदी सेवेत कार्यरत आहेत. या सर्वांना चांगले वेतन दरमहा प्राप्त होते. 11 जानेवारीपासून शासन मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना किमान कौशल्य विकास योजनेअंतर्गत बेडसाईड असिस्टंट अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
कॉलेजमध्ये परिचारिका दिन, विद्यार्थी स्वागत, शपथविधी समारंभ, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा या उपक्रमातून विद्यार्थिनींना व्यक्तीमत्व विकासाची संधी मिळते. तसेच एनएसएस विभागाच्या शिबिरांमध्ये श्रमदान, बंधारा बांधणी, वृक्षारोपण उपक्रम राबवले जातात. जिल्हा शासकीय रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, जि. प. अंतर्गत शासकीय कार्यक्रमा, सहकार्य, सहभाग, रॅली, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रमात विद्यार्थिनी भाग घेतात. पोलिओ डोस कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी भाग घेतला.*महिला सक्षमीकरणावर भर*नर्सिंग कॉलेजने विविध सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले आहे. महिलांचे सक्षमीकरण, क्रीडा स्पर्धांमध्ये भाग, सामाजिक सेवा, सुधारणा कार्य, रुग्णांची सेवा करण्याची संधी व प्रशिक्षण, महिला, विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो. विविध कार्यक्रमातून स्वतःला सिद्ध करण्यास प्रोत्साहन व स्वबळावर उभे राहण्यासाठी विद्यार्थिनींना बाळासाहेबांच्या कार्यातून संधी मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button