वेरॉनमधील चोरीप्रकरणी संशयितांची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी शहरानजिक मिरजोळे एमआयडीसीमधील वेरॉन कंपनीतील ८०० किलो ऍल्युमिनियम चोरी प्रकरणी पोलिसांनी कन्टेनरचालक विद्यासागर तिवारी, कंपनीचे सुरक्षारक्षक रमाकांत हैबत, प्रशांत मोरे, राजेश मयेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कोर्टात दोषारोपपत्र ठेवले होते. परंतु खटल्याच्या दरम्याने साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळल्याने व आरोपींवरील आरोप शाबीत न झाल्याने कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
www.konkantoday.com