
चिपळूण नगर परिषदेच्या घरपट्टी विभागात सुधारणा करा-शिवसेनेचे शहरप्रमुख शशिकांत मोदी
चिपळूण नगर परिषदेच्या घरपट्टी विभागात सुधारणा करा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेत नागरिक घरपट्टी भरण्यासाठी आले असता अनेकदा त्यांना सर्व्हरची गती कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना खूप वेळ थांबावे लागते. याचा विचार करून या समस्येवर मार्ग काढावा व नगर परिषदेत लिपिकांची संख्या वाढवावी, बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर आणि बुरूमतळी येथे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये घरपट्टी स्विकारण्याची सोय करावी, अशी मागणीही मोदी यांनी केली आहे. www.konkantoday.com