
एमआडीसीत गाजलेल्या कोकेन तस्करी प्रकरणी आरोपीची सुटका,ते कोकेन नसल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध
पाच महिन्यांपूर्वी रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी येथे ग्रामीण पोलिसांनी कोकेन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले होते रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढी मोठी कामगिरी पार पडली होती.पकडलेले कोकेन हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यामध्ये कोकेनचा घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानंतर पोलिसांनी न्यायालयाला संशयित आरोपींना सोडण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने आरोपींची सुटका केली.शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोकेन मिळाल्याने हे प्रकरण गाजले होते याप्रकरणी पोलिसांनी दिनेश सुभे सिंह, सुनील राणा , राजस्थान ,रामचंद्र मलिक ,अंकित सिंग ,मुकेश सबेरान,अभिनव प्रेमसिंह सर्व राहणार राजस्थान या सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते.यातील दोन जण तटरक्षक दलातील कर्मचारी असल्याने खळबळ उडाली होती .मात्र आता प्रयोगशाळेत ती पावडर कोकेन नाही असा अहवाल आला आहे .
www.konkantoday.com