
क्रिकेट खेळून परतणार्या तरूणाचा हातातील बांबूचा एमएसईबीच्या वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू
चिपळूण उक्ताड येथील एन्रॉन पुलाजवळ क्रिकेट खेळून परतणार्या तरूणाच्या हातात असलेल्या लाकडी बांबूचा स्पर्श एमएसईबीच्या ओव्हरहेड वायरला झाल्याने या तरूणाचा मृत्यू झाला. या तरूणाचे नाव सऊद साजीद तांबे (रा. उक्ताड, चिपळूण) असे आहे. सऊद हा उक्ताड येथील एन्रॉन पुलाजवळ क्रिकेट मैदानाजवळ क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळून तो परत घरी येत असताना मैदानात पडलेला ओला बांबू त्याने उचलला व तो घेवून हात वर करून तो परत येत असता या बांबूचा स्पर्श एमएसईबीच्या ओव्हरहेड लाईनला झाला. त्यामुळे त्याला जबरदस्त शॉक बसला. त्याला उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु त्या ठिकाणी त्याला डॉक्टरनी मयत झाल्याचे घोषित केले.
www.konkantoday.com