
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे मार्केटींग करण्यात येणार
कोकणात असलेल्या विविध ठिकाणच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांना देशविदेशातील पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सरसावले आहे. या मंडळाने या नवीन धोरणानुसार आता खाजगी हॉटेल, निवास व न्याहारी योजनाधारकांची महामंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक ठिकाणी उपलब्ध असलेले ट्रेकिंगसाठीच्या जागा, ट्रॅव्हल ऑपरेटर, पर्यटन गाईड, न्याहारी निवास केंद्रे, कोकणी खाद्यपदार्थ, लोककला, जवळची पर्यटन स्थळे याची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे कोकणात पर्यटन विकासाला चालना मिळेल असे पर्यटन विकास महामंडळाचे कोकणचे प्रमुख संजय ढेकणे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com