स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानची दिनदर्शिका
स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठान, डोंबिवली यांनी ‘न समजलेले स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही
डिजिटल दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.
धर्म आणि संस्कृती याकडे पाहण्याची स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विज्ञाननिष्ठ दृष्टी नव्या पिढीला कळावी आणि अस्पृश्यता निवारक, विज्ञानवादी विचार प्रणाली समाजात रुजावी यासाठीचा हा प्रयत्न केला असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानचे आशुतोष पाठक यांनी सांगितले.
विज्ञान, धर्म, जात-पात, हिंदुत्व, राष्ट्र, संस्कृती या बाबतचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे
विचार जानेवारी ते डिसेंबर-२०२० या प्रत्येक महिन्याच्या पानावर देण्यात आले आहेत.
प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमातून सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी उलटसुलट लिहिणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांच्याविषयी अपप्रचार करणे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. अशा वेळी सावरकर यांचे विचार दिनदर्शिकेच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठान, डोंबिवली
आशुतोष पाठक- 9930772488
www.konkantoday.com