गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनात ५५ लाखांची उलाढाल
गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या सरस प्रदर्शनात १८६ महिला गट सहभागी झाले होते. या प्रदर्शनात ५५ लाखांची उलाढाल झाली. कोकणात मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांनी या सरस प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादीत वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते. मात्र काजूगराला पर्यटकांनी जास्त प्राधान्य दिले.
www.konkantoday.com