
लग्नासाठी नवरा-मुलगीही तयार, वर्हाडीही हजर पण लग्नाचा काही मुहूर्त मिळेना, कुवारबांव ते पोमेंडी तिठा रस्त्याची व्यथा
एखाद्या लग्नासाठी असणारी तयारी पूर्ण झाली आहे. नवरा, मुलगी पासून वर्हाडीही तयारीत आहेत. मात्र लग्नाचा काही मुहूर्त मिळत नसल्यामुळे सर्वांनाच वाट पहावी लागत आहे असाच काहीसा प्रकार कुवारबांव ते पोमेंडी तिठा या आरटीओच्या मार्गावरील रस्त्याचा झाला आहे. या रस्त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून दुचाकी चालविणे अशक्य बनले आहे. या रस्त्याच्या कामासाठी खडी, बारीक वाळू व अन्य सामान येवून पडलेले आहे. मात्र या रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. सर्व तयारी असूनही रस्त्याचा मुहूर्त कधी मिळणार असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
www.konkantoday.com