पर्ससीन मासेमारी आजपासून बंद, मच्छिमार आर्थिक अडचणीत
महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार आजपासून पर्ससीन मासेमारी बंद झाली आहे. यामुळे पर्ससीन नेटद्वारे २७४ नौकांची मच्छिमारी थांबणार आहे. शासनाच्या सागरी अधिनियमाप्रमाणे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा पर्ससीन नेटवाल्यांसाठी मच्छिमारीचा हंगाम होता. मात्र सध्या विविध कारणामुळे वादळे, पाऊस आदीमुळे मच्छिमारी हंगामाच्या काळातच मच्छिमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे त्या काळात मच्छिमारांना मच्छिमारी करता आली नव्हती. आता त्यातच नियमाप्रमाणे आजपासून बंदी करण्यात आल्याने मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
www.konkantoday.com