
नवीन वर्षाच्या पार्टीतच जुंपली, मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल
कारवांचीवाडी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी ठेवलेल्या पार्टीत सहाजणांनी अशोक पांडरंग कुळ्ये (रा. कुळ्येवाडी) याला मारहाण केल्याच्या आरोपावरून श्रेयस बारगोडे, राकेश बारगोडे, शुभम बारगोडे, विरंेंद्र बारगोडे, शरद बारगोडे, प्रमोद बारगोडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादी यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी जेवणाचा कार्यक्रम पर्यावठार येथे ठेवला होता. त्यासाठी त्यांनी मित्रांना बोलावले होते. त्यातील अमोल कुळ्ये याचा फोन लागत नव्हता म्हणून त्याने आशिष कुळ्ये याला फोन लावला असता यातील आरोपींनी गैरसमज करून घेवून फिर्यादीला येवून मारहाण करून दगड मारून जखमी केले.
www.konkantoday.com