
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद, पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री सतीश चर्तुवेदी यांची नावे स्पर्धेत
राज्यातील निवडणुकानंतर काँग्रेसने शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार या चर्चेने जाेर धरला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानं त्यांच नाव स्पर्धेतून बाहेर पडलं असून, माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि माजी मंत्री सतीश चर्तुवेदी यांची नावे स्पर्धेत आहेत.
www.konkantoday.com