
रोप वे’च्या कंपनीला जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली
रायगड किल्ल्यावरील ‘रोप वे’च्या संचालक कंपनीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी नोटीस बजावली आहे. पुरातत्व विभाग आणि संबधित यंत्रणांच्या परवानगीशिवाय ‘रोप वे’ प्रकल्पाच्या क्षमतावृध्दीचे काम सुरु केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्हाप्रशासनाने ही नोटीस जारी केली आहे.
www.konkantoday.com