क्रीडा खात्याच्या कारभारामुळे जलतरण तलाव बंद नागरिकांची गैरसोय
रत्नागिरी शहरात असलेल्या शासकीय जलतरण तलावा बाबत क्रीडा विभागातर्फे ढिला कारभार चालू आहे त्याचा फटका रत्नागिरीतील जलतरणप्रेमींना बसला आहे. कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा तलाव नोव्हेंबरपासून बंद आहे.
रत्नागिरीतील जालतरण तलाव जलतरण प्रेमींसाठी व मुलांसाठी उपयोगात येत असतो या ठिकाणी छोटया मोठ्या स्पर्धा होत असतात.या सर्वांचा कारभार क्रीडा खाते बघत असते.जलतरण तलावासाठी दरवर्षी ठेकेदार नेमले जातात.ठेकेदार बदलण्याची प्रक्रियेच्या दरम्यान नवा ठेकेदार नेमे पर्यंत जलतरण तलाव बंद राहत असतो. वास्तविक पहिल्या ठेकेदाराची मुदत कधी संपणार आहे हे क्रीडा विभागाला माहित असते त्यादरम्यान नवीन प्रक्रिया सुरू केली असती तर जलतरण तलाव बंद ठेवण्याची वेळ आली नसती.परंतु क्रीडा विभाग पहिल्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात करते त्यामुळे मधल्या काळात नवीन ठेकेदाराची नेमणूक होईपर्यंत हा तलाव बंद राहताे.याबाबत रत्नागिरीकरांची खूप गैरसोय होत असून याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com