
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे रत्नागिरीत आगमन
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे रत्नागिरीत आगमन झाले त्यावेळी त्यांचे आ. प्रसाद लाड, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक पटवर्धन यांच्या प्रचार रॅलीसाठी हे भाजपचे मान्यवर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या स्वागतासाठी भाजपचे सरचिटणीस राजू भाटलेकर, भाजपा नेते संतोष गांगण, राजीव कीर, सरचिटणीस राजन फाळके, माजी शहर अध्यक्ष प्रशांत डिंगणकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com