लोटे एमआयडीसीत रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखान्याचे काम टाटा कंपनीला
चिपळूण तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखाना उभारणीचे काम सुरू झाले आहे. कारखाना उभारणीचे काम रेल्वेकडून टाटा कंपनीला देण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये प्रदूषणविरहित पहिल्या कारखान्याला सुरूवात झाली आहे.
लोटे परिसरातील दाभिळ, आयनी, मेटे, असगिणी आदी गावातील ६५० हेक्टर क्षेत्र अतिरिक्त लोटे एमआयडीसीसाठी संपादित झाले आहे. यातील ८९ हेक्टर क्षेत्रावर रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखाना उभारला जाणार आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीतील ११ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. यातील रेल्वेचा पहिलाच कारखाना सुरू झाला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये रेल्वेचे कोच बनविण्याच्या कारखाना उभारणीसाठी मंजुरी दिली. पाचशे कोटीच्या या प्रकल्पासाठी दोन वर्षापूर्वी भूमिपूजन झाले होते.
www.konkantoday.com