मुंबई गोवा महामार्गाला कै.बाळशास्त्री जांभेकरांच नाव द्या
कोकणातील पत्रकारांच्या संघर्षामुळेच मुंबई-गोवा महामार्ग निर्माण झाला.त्यामुळे आद्य पत्रकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव या महामार्गाला देण्यात यावे,अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्तएस.एम.देशमुख यांनी आज येथे केली.महाराष्ट्र राज्या प्रमाणे गोवा शासनाने सुद्धा तेथील पत्रकारांसाठी संरक्षण कायदा करावा,अशी मागणी आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत.त्यासाठी उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत,असेही यावेळी श्री.देशमुख यांनी सांगितले.मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये पत्रकारांची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते._
_यावेळी प्रमुख अतिथी भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले-सावंत,किरण नाईक कार्याध्यक्ष शरद पाबले, गजानन नाईक ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,जिल्हा खजिनदार उमेश तोरस्कर,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई तसेच सोशल सेलचे जिल्हा निमंत्रक अमोल टेंबकर,अभिमन्यू लोंढे,संतोष सावंत,हरिश्चंद्र पवार,रामचंद्र कुडाळकर,देवयानी ओरसकर,मोहन जाधव,नरेंद्र देशपांडे,रमेश जोगळे, सुहास देसाई,विलास कुडाळकर, बंटी केनवडेकर ,सुजित राणे अजित राऊळ, बबन गवस ,वैशाली खानोलकर, प्रवीण मांजरेकर,उमेश सावंत,आनंद लोके, भगवान लोके, कुणाल मांजरेकर,अनिल भिसे,शैलेश मयेकर,हेमंत मराठे,महिला संघटक जान्हवी पाटील,अण्णा केसरकर, बाबू लोके राज्यातील पत्रकारांमध्ये श्रीराम कुमठेकर(लोणावळा),संजय पितळे( ठाणे) , सुहास चौरे(बीड), सुभाष वरहाडे(नागपूर), पी जी कुलकर्णी(सोलापूर), नरसिंह भोने(लातूर), सुरेख नायकवडे(परभणी),अविनाश मांडेकर (गडचिरोली -नागपूर), विजय मोकल(रायगड) उदय देशपांडे (चंदगड-कोल्हापूर) यशवंत पवार ,रोहिदास आके (धुळे) ,श्री वत्सन (नांदेड) आदीसह राज्यातील २४ जिल्हे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते._
_श्री.देशमुख पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ मागील बारा वर्ष आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.ही बाब दुर्दैवी आहे, परंतु या संघर्षामुळे आधुनिक स्मारक निर्माण होत आहे.असे त्यांनी सांगून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या आत ग्रंथालय निर्माण केले जावे आणि या ग्रंथालयात जगभरातील जर्नालिझम ची पुस्तके उपलब्ध करून देशभरातील पत्रकारांना तुमचा अभ्यास करण्यासाठी संधी दिली गेल्यास या ठिकाणी पत्रकार येतील आणि मराठी पत्रकार परिषद त्यासाठी प्रयत्न करेल असे देशमुख म्हणाले.
www.konkantoday.com