पितांबरी उद्योग समुहाची आता संगणक क्षेत्रात झेप आयओकेन अँटीव्हायरसची निर्मिती

पितांबरी उद्योग समूहाच्या आयओकेन या अँटीव्हायरसचे उदघाटन कर्‍हाडे ब्राह्मण व्यावसायिक व उद्योजक (केबीबीएफ) ज्ञातीबांधवांच्या ग्लोबल मीटमध्ये झाले. खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणार्‍या पितांबरीने संगणकविषयक वेगळ्या क्षेत्रात या निमित्ताने पाऊल टाकले आहे. तुरळ (ता. संगमेश्‍वर) येथे रस्टिक हॉलिडेजच्या आवारात हा कार्यक्रम झाला. पितांबरी उद्योग समुहाने विकसित केलेल्या आयओकेन अँटीव्हायरसचे उदघाटन केबीबीएफचे अध्यक्ष पी. पी. गुणे, पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभूदेसाई, नितीन करकरे, प्रशांत पाध्ये यांच्या हस्ते झाले.
व्हायरसपासून संगणकाचे संरक्षण करण्याबरोबरच संगणकावरून डिलीट झालेला डाटाही रिकव्हर करण्याची या अँटीव्हायरसची क्षमता असल्याचा दावा प्रभूदेसाई यांनी केला. पाच मिनिटामध्ये कॉम्प्युटर कन्सेप्ट कोकण विभागाकरिता मुख्य वितरक म्हणून नेमणूक केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button