दृष्टी नसलेल्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नॅब हॉस्पिटलचे काम कौतुकास्पद
दृष्टी नसलेल्या व्यक्तीस नाविन्यपूर्ण उपक्रमातून आधाराचा हात देत त्यांना सक्षम करण्याबरोबरच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे चिपळूण नॅब हॉस्पिटल हे दृष्टीबाधितांमध्ये नंदनवन फुलवत आहे. आज नॅबमुळेच अनेक दृष्टीबाधित स्वतःच्या पायावर उभे रहात इतरांसाठी आदर्श असे काम करीत आहेत, असे गौरवोदगार महाराष्ट्र नाशिक नॅब युनिटचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी काढले. राष्ट्रीय अंध कल्याण संघ (नॅब) चिपळूण शाखेच्यावतीने दृष्टीबाधितांचे स्नेहसंमेलन नुकतेच माधव सभागृहात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक स्वागत थोरात यांना रतनबाई घरडा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या दरम्यान मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाचा तिमिरातून तेजाकडे वाद्यवृंद सुमधुर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव, महाराष्ट्र नाशिक नॅब युनिटचे उपाध्यक्ष सुर्यभान साळुंखे, नगरसेवक शशिकांत मोदी, चिपळूण नॅबचे अध्यक्ष सुचय रेडीज, उपाध्यक्ष नीलेश भुरण, सहकार्यवाह सुचेता लाड, खजिनदार नयन साडविलकर, संचालक अंबरीश खातू, ऍड. विवेक रेळेकर, सलीम पालोजी, चिपळूण नॅबचे संदीप नलावडे यांचेसह अंधबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com